हरियाणाची डान्सर सपना चौधरीचा भाजप प्रवेश

नवी दिल्ली – हरियाणाची डान्सर सपना चौधरीने आज भाजपमध्ये प्रवेश करत नवीन वाटचाल सुरू केली आहे. दिल्ली येथील जवाहर लाल नेहरु स्टेडियममध्ये भाजपच्या सदस्यता अभियानास प्रारंभ झाला आहे. याप्रसंगी सपना चौधरीला पक्षाची सदस्यता बहाल करण्यात आली. यावेळी भाजपचे सरचिटणीस शिवराज सिंह चौहान, रामलाल, डॉ. हर्षवर्धन यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते.

भाजप प्रवेशाबाबत सपना म्हणाली की, भाजपात प्रवेश करण्यापूर्वी काहीही विचार करण्याची आवश्‍यकता नव्हती. मी मातीशी जोडलेली आहे. पक्षाच्या कामाने प्रभावित आहे. त्यामुळेच मी भाजप प्रवेश केला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी सपना चौधरीने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी यांच्याविरोधात सपना चौधरी कॉंग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचीदेखील चर्चा रंगली होती.

सपनाचा कॉंग्रेस प्रवेश आणि निवडणुकीचे तिकीट यावरुन अनेक वादही झाले. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींसह अनेक कॉंग्रेस नेत्यांसोबतचे सपनाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे सपनाने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे सर्वांना वाटत होते. परंतु या सर्व वादांनंतर सपनाने स्वतः आपण कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे जाहीर केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.