आरएसएफकडून पाकिस्तानवर टिका

इस्लामाबाद – माध्यमांची मुस्कटदाबी करीत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय माध्यम जगताने पाकिस्तान सरकारचा निषेध केला आहे. देशातील अबतक टीव्ही, 24 न्यूज आणि कॅपिटल टीव्ही या तीन वाहिन्यांनी मरियम नवाज यांची पत्रकार परिषद लाईव्ह दाखवल्याने त्यांचे प्रक्षेपण सरकारने बंद केल्याबद्दल रिपोर्टर्स सॅन्स फ्रन्ट (आरएसएफ) या संघटनेने ही हुकूमशाही वृत्ती असल्याचे म्हणत पाकिस्तानवर टिका केली आहे.

मात्र, सरकारी प्रवक्त्‌याने मात्र, या वाहिन्या न दिसण्यामागे तांत्रिक कारण असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तान इलेक्‍ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऍथॉरिटीने ही कारवाई लष्करी दबावाखाली घेतल्याचे आरएसएफच्या सुत्रांनी म्हटले आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका संबंधित वाहिन्यांवर ठेवण्यात आला आहे. मरियम यांच्या पत्रकार परिषदेमुळे सरकार नाराज आहे.
शरीफ यांच्याविरोधात निकाल देण्यासाठी आपल्यावर दबाव असल्याचे न्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे असे मरियम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खटला सुरू असलेल्या राजकीय नेत्यांना माध्यमातून प्रसिद्धी देऊ नये, असे निर्देश पंतप्रधान इम्रान खान यांनी दिले होते. विरोधी नेत्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच ही उपाययोजना केल्याचे डॉनया वृत्तपत्राने दिलेल्या एका वृत्तत म्हटले आहे. त्यातच पाकिस्तानची सर्वांत मोठी खासगी माध्यमसंस्था असलेल्या जिओ न्यूज टीव्हीने माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांची प्रक्षेपित होत असलेली मुलाखत मध्येच थांबवली होती.

यावरुन पाकिस्तानातील लष्कर किंवा सरकारविरोधी वृत्तांकनावर देशात सातत्याने दबाव आणला जात असून ते वृत्तांकन होऊ नये या साठी माध्यमांची मुस्कटदाबी चालू असल्याचे आरएसएफने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)