मतदान झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील आचारसंहिता शिथिल करा

मुंबई – लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून दुष्काळग्रस्त असलेल्या विदर्भातील सर्व, तर मराठवाड्यातील बहुतांश मतदारसंघातील निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त भागातील आदर्श आचारसंहितेला शिथिल करावी, अशी मागणी कै. वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.

याबाबत किशोर तिवारी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा देखील केली आहे. दुष्काळग्रस्त विदर्भ, मराठवाड्यात 10 मार्चपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी केल्यापासून दररोज 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या काळात हा आकडा 292 वर गेला आहे, असा दावा तिवारी यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, रोजगार, पाणी, चारा आणि नवीन पीककर्ज याबाबतचे प्रश्न निवडणुकीचे काम समोर करून सनदी अधिकारी, कर्मचारी टाळत आहेत. त्यामुळे धोरणात्मक निर्णय वळगता मदत पुनर्वसनाच्या कामांना गती देण्याकरता लोकसभेच्या मतदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यात निवडणूक झालेल्या भागात आदर्श आचारसंहितेला शिथिल करण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यात 10 मार्चपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाल्यांनतर दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांचे पाणी, चारा तसेच मजुरीसाठी हाल होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा तक्रारी आल्यानंतर मदत पुनर्वसनच्या कामाना आदर्श आचारसंहितेचा नावावर का रोखत आहात? अशी विचारणा केल्यावर अधिकारी निवडणूक आयोग आणि आचारसंहितेचे कारण समोर करत आहेत. यामुळे किशोर तिवारी यांनी हा वाद निवडणूक आयोगसमोर आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)