महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीचे शतक

जयपूर – महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीच्या शतकाच्या बळावर महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड यांच्यातील रणजी सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या दिवशी सर्वबाद 239 धवापर्यंत मजल मारली आहे. तर प्रत्युत्तरात छत्तीसगडने दिवसअखेर 3 बाद 23 धावा केल्या आहेत. छत्तीसगडचा संघ अजूनही 216 धावांनी मागे असून यांचे सात गडी बाद होणे बाकी आहेत.

महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घातला. सलामीवीरांनी चांगली सलामी दिल्यावर मधल्याफळीतील ऋतुराज गायकवाड, केदार जाधव आणि कर्णधार अंकित बावणे तिघेही शून्यावर बाद झाल्याने महाराष्ट्राची धावसंख्या 4बाद 46 झाली होती.

त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि फिरकीपटू अनुपम संकलेचाने महाराष्ट्राचा डाव सांभाळला. त्रिपाठी 102 धावा करून बाद झाल्यावर संकलेचाने 66 धावा बनविल्या आणि महाराष्ट्राला 239 पर्यंत मजल मारुन दिली. वी. कुशवाह याने 59 धावा देत 4 बळी मिळवले तर पंकज राव ने 3 गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.

छत्तीसगड संघाची सुरुवात खराब झाली असून त्यांचे आघाडीचे 3 फलंदाज 13 धावांमधेच तंबूत परतले होते. छत्तीसगडने 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा बनविल्या आहेत. हरप्रीत सिंग नाबाद 13 आणि मंडल नाबाद 4 धावांवर खेळत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)