पिंपरी -किरकोळ कारणावरून सावत्र भावाने चाकूने छातीवर वार करुन जखमी केल्याचा प्रकार मोशी (बोऱ्हाडेवाडी) येथे शुक्रवार (दि.3) रोजी सांयकाळी पाच वाजताच्या सुमारास घडला. सुनिल बाबुराव सस्ते (वय- 30, रा. बोराडेवाडीरोड, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांचा सावत्र भाऊ विक्रम बाबुराव सस्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादीचा आरोपी हा सावत्रभाऊ असून त्याने बाळू महादु मोरे (वय-45) यांना लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीलाही भाजी कापण्याच्या चाकूने उजव्या हातावर वार करुन जखमी केले. अधिक तपास पोउपनि दरेकर हे करीत आहेत.