सांख्यिकी खात्याकडून ‘वेळेच्या वापरा’चे सर्वेक्षण

आकुर्डी : केंद्रीय सदनातील क्षेत्रीय शिबिरात मार्गदर्शन करताना "एनएसएसओ'च्या "फिल्ड ऑपरेशन्स' विभागाचे उपमहानिदेशक अवदेश कुमार मिश्रा.

अवदेश कुमार मिश्रा : आकुर्डीतील क्षेत्रीय शिबिरात दिली माहिती

पिंपरी  – सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी खात्यांतर्गत पुणे विभागाच्या नमुना सर्वेक्षण कार्यालया (एनएसएसओ) कडून कुटुंबाची जमीन आणि पशुधन धारणा व शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्यांकन आणि कर्ज व गुंतवणूक हे सर्वेक्षण 1 जानेवारी 2019 पासून सुरू होणार आहे. यासोबतच वेळेचा वापर सर्वेक्षण करण्यात येणार असून प्रथमच अशा प्रकारचे सर्वेक्षण होत असल्याची माहिती “एनएसएसओ’च्या “फिल्ड ऑपरेशन्स’ विभागाचे उपमहानिदेशक अवदेश कुमार मिश्रा यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“एनएसएसओ’च्या 77 व्या दौऱ्याच्या क्षेत्रीय शिबिराचे आयोजन आकुर्डी येथील केंद्रीय सदन येथे करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन अवदेश कुमार मिश्रा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे उपनिदेशक श्रीनिवास शिर्के, अर्थ व सांख्यिकी निदेशालायाच्या क्षेत्रीय संयुक्त निदेशक सुजाता अय्यर उपस्थित होते.

अधिक माहिती देताना अवदेश कुमार मिश्रा म्हणाले की, कुटुंबाची जमीन आणि पशुधन धारणा आणि शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्यांकन या सर्वेक्षणाचा उपयोग कृषी, सहकार व शेतकरी कल्याण, पशुसंवर्धन विभाग, शेतकरी आणि मत्स्य व्यवसाय, कृषी खर्च आणि किंमत आयोग (सीएसीपी), राष्ट्रीय लेखा विभाग, विविध संशोधन संस्था आणि धोरण विषयक नियोजन या सर्वांसाठी उपयोगी ठरेल. तसेच कर्ज आणि गुंतवणूक या सर्वेक्षणाचा वापर भांडवली गुंतवणूक, कर्जबाजारीपणा, ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेची रचना आणि इतर संकेतकांच्या बांधणीसाठी होईल.

कुटुंबाचा सर्व्हे करताना, विविध विषयांची माहिती गोळा करण्यात येते त्याचप्रमाणे भारतात पहिल्यादाच वेळेचा वापर सर्वेक्षण करण्यात येत असल्याने आर्थिक क्षेत्रातील सहभागाबरोबरच विशेषत: गृहिणी ज्या घरकामासोबतच आपल्या मुलांच्या संगोपणाची जबाबदारी सांभाळतात त्यांच्या वेळ वापराचे सर्वेक्षण देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिरादरम्यान 100 हून अधिक क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. सर्व नागरिकांना सर्वेक्षणाच्या कामकाजा दरम्यान सहकार्याचे आवाहन “एनएसएसओ’ विभागामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)