भाजपकडून आयात नेत्यांना संधी – एकनाथ खडसेंची नाराजी

नवी दिल्ली – बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित राज्य मंत्रीमंडळाचा आज (रविवारी) विस्तार करण्यात आला. नव्या मंत्रीमंडळात सुरुवातीलाच पक्षात आलेल्या नव्या नेत्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. याबाबत भाजपचे नेते आणि मंत्रीपदापासून दूर ठेवलेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्‍त करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

मंत्रीपदापासून लांब ठेवल्यामुळे एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रीमंडळ विस्तारावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, मंत्रीमंडळात जायला मला आता पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नाही. पक्षाने आयात केलेल्या नेत्यांना संधी देणे सुरु केले आहे.

खडसे म्हणाले की, पक्षाने आयात नेत्यांना संधी दिली आहे. परंतु त्याच वेळेला पक्षातील जुन्या नेत्यांना डावलले आहे. आमच्या पक्षात असे अनेक नेते आहेत जे चार-पाच वेळा निवडून आलेले आहेत. तरीसुद्धा त्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते दुःखी आहेत, त्यांचे दुःख सहाजिक आहे.

खडसेंना मंत्रीपद दिले गेले नाही, याबाबत खडसेंना विचारले असता ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीला अवघा तीन महिन्यांचा काळ राहिला आहे. त्यापैकी दीड महिने आचार संहितेत जातील. त्यामुळे जाता-जाता नावापुरतं मंत्रीपद घेण्यात काय अर्थ?, असा टोलाही त्यांनी लगाविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)