हृतिक रोशनचा “सुपर 30′ पुन्हा अडचणीत

हृतिक रोशनच्या “सुपर 30’पुढील अडचणी संपता संपत नाहीयेत. जशी जशी या सिनेमाची रिलीज डेट जवळ यायला लागली आहे, तसे प्रॉब्लेम पुन्हा डोके वर काढायला लागले आहेत. आता एका नवीनच समस्येने या सिनेमाच्य निर्मात्यांना घेरले आहे. हा सिनेमा ज्या गणिततज्ञाच्या जीवनावर आधारित आहे, त्या आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या आणि “आयआयटी’मध्ये प्रवेश मिळवलेल्या 2018 सालच्या बॅचच्या विद्यार्थ्यांची नावे द्या, अशी मागणी “आयआयटी’च्या चार विद्यार्थ्यांनी केली आहे.

गोवाहटी हाय कोर्टाने आता आनंद कुमार यांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे. या नोटीशीतील प्रश्‍नांना उत्तर देणे आनंद कुमार यांना शक्‍य झालेले नाही. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या तर्कामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांची दिशाभूल होऊ शकते, असे या चार विद्यार्थ्यांच्या वकिलांनी म्हटले आहे. या सिनेमाचे नायक असलेले आनंद कुमार गरिब विद्यार्थ्यांना गणित शिकवून “आयआयटी’मध्ये प्रवेश घ्यायला मदत करतात, असे दर्शवलेले आहे. याच आनंद कुमार यांच्या संघर्षावर हा सिनेमा आधारलेला आहे. पण यातून प्रेक्षकांपर्यंत चुकीचा संदेश जात असल्याने या सिनेमाच्या रिलीजला या चार माजी विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.