गटारी अजूनही तुंबलेल्याच; मनपा आयुक्तांनी परिसराची पाहणी

नगर: पावसाळ्याच्या प्रारंभीच दिल्लीगेट परिसर जवळील निलक्रांती चौक ते न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड महाविद्यालय परिसरात गटारी तंबून पावसाचे पाणी साचत असताना मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सदर परिस्थितीची पहाणी केली.

यावेळी माजी नगरसेवक ऍड.धनंजय जाधव, मितेश शहा, पुरुषोत्तम सब्बन, राहुल मुथा, मनपाचे इंजिनीयर निंबाळकर, एस.आय.रामदिन, प्रभाग अधिकारी साबळे, केरटेकर संदीप चव्हाण आदि उपस्थित होते.

निलक्रांती चौक भागातील गटारी तुंबलेल्या असल्याने पाऊसाचे पाणी वाहून जाण्यास तयार नाही. परिणामी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून हा परिसर जलमय होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.