वारंवार बदल का केला जात आहे?

जीएसटीबाबत पी. चिदंबरम यांचा केंद्र सरकारला सवाल

नवी दिल्ली – केंद्र सरकारने मोठा दावे करीत जीएसटी करप्रणाली अंमलात आणली आहे. मात्र सुरुवातीपासून यात वेळोवेळी मोठे बदल केला जात आहेत. त्यामुळे करदात्यांना सुरुवातीपासून मोठा त्रास होत आहे. तरीही केंद्र सरकार वेळोवेळी करप्रणालीच्या ध्येयाबाबत का बदल करीत असल्याचा सवाल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कालपर्यंत एकच कर असणे म्हणजे वेडगळपणा असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता काही कालावधीनंतर एकच कर टप्पा करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगितले जात आहे. या अगोदरच केलेल्या सूचनांचा विचार केला गेला असता तर सरकारवर अशी वेळ आली नसती. मात्र सुरुवातीपासून कराचे अनेक टप्पे ठेवण्याचा आग्रह धरण्यात आला. त्यामुळे जनतेचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया गेला असल्याचे चिदंबरम म्हणाले.

कॉंग्रस पक्षाने सुरुवातीपासून 18 टक्‍क्‍यांच्यावर कर असू नये, असे सांगितले होते. मात्र त्यावर टीका करून कराचे दर 48 टक्‍क्‍यांपर्यंत ठेवले गेले. आता सरकार म्हणते की 18 टक्‍क्‍यांवर कर असणार नाही. या अगोदरच मुख्य आर्थिक सल्लागारांनी 15 टक्‍के हा सर्वसाधारण दर असावा असा अहवाल सादर केला होता. त्याकडे सरकारने दूर्लक्ष करून मनमानी केली. आता तो अहवाल योग्य असल्याचे सरकार सांगत आहे.

महत्त्वाच्या मुद्द्यावर मनमानी करण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे देशातील कर देणाऱ्यांना काम करता आले नाही. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. त्याचबरोबर रोजगार निर्मितीवर परिणाम झाला असल्याचे ते म्हणाले. मात्र, काही राज्यातील निवडणुकानंतर सरकारला आता जाग आली आहे. ज्या मागण्या विरोधी पक्षानी सुरुवातीलाच केल्या होत्या त्या मागण्या सरकारकडून आता पूर्ण केल्या जात आहेत. जर सरकारने पुरेसा गृहपाठ केला असता तर लोकांचे आणि देशाचे नुकसान झाले नसते, असे त्यांनी सांगितले. योग्य सूचनांचा अनादर केल्यामुळे असे होत आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)