“नासा’ची महिला अंतराळवीर 328 दिवस अंतराळात राहणार

वॉशिंग्टन – सलग 328 दिवस अंतराळात एकाच अवकाशयानात महिला अंतराळवीराने राहण्याचा विक्रम “नासा’ची अंतराळवीर ख्रिस्तिना कोच करणार आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस) वरून नासा एकूण 3 मोहिमा राबवणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक व अंतराळवीर नुकतेच ठरवण्यात आले. या मोहिमांमध्ये जेसिका मेइर या महिला अंतराळवीराचे पहिले अवकाशयान आणि नासाचे अंतराळवीर अँड्रयू मॉर्गन यांचे अंतराळातील वास्तव्य यांचाही समावेश आहे. यामध्ये सलग 328 दिवस अंतराळात एकाच अवकाशयानात राहण्यासाठी ख्रिस्तिना कोचची निवड झाली आहे.
ख्रिस्तिना कोच ही महिला अंतराळवीर यावर्षी 14 मार्च रोजी आयएसएसवर दाखल झाली होती. नव्या वेळापत्रकानुसार ख्रिस्तिना पृथ्वीच्या कक्षेत फेब्रुवारी 2020 पर्यंत राहणार आहे. यापूर्वी पेगी व्हिटसन या महिला अंतराळवीराने सलग 288 दिवस अंतराळात वास्तव्य केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)