#Video : लोकसभेत आठवलेंचे भाषण; मोदींसह राहुल आणि सोनियांनाही हसू अनावर

नवी दिल्ली – भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची आज लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच त्यात आजच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा वाढदिवस असल्याने रामदास आठवलेंनी दोघांनाही खास त्यांच्या शैलीत शुभेच्छा दिल्या त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनाही हसू आवरता आलं नाही.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना त्यांनी कविताच केली, आठवलेंच्या या कवितेने सर्व सभागृहच हास्यकल्लोळात बुडालं. अध्यक्ष ओम बिर्ला यांना आपल्या अनोख्या शैलीतून अभिनंदन करताना रामदास आठवले म्हणाले की, ‘एक देश का नाम है रोम, लेकिन लोकसभा के अध्यक्ष बन गए हैं बिड़ला ओम. लोकसभा का आपको अच्छी तरह से चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लैकलिस्ट में डालना है नाम. नरेंद्र मोदीजी और आपका दिल है विशाल, राहुलजी आप रहो खुशहाल. हम सब मिलकर हाथ में लेते हैं एकता की मशाल, और भारत को बनाते हैं और भी विशाल. आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए हैं शान, भारत की हमें बढ़ानी है शान, लोकसभा चलाने के लिए आप हैं पर्फेक्ट इंसान’.

तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधत राहुल गांधी यांची फिरकी घेतली. ते म्हणाले, तुमची सत्ता असताना मी मच्यासोबत होतो. तेव्हाच मला हवेचा रोख कळला होता. नरेंद्र मोदी यांची हवा होती त्यामुळे मी मोदींसोबत गेलो. यापुढची पाचवर्ष तुम्ही तिथेच बसा. नंतरही आमचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका.

पुढे बोलताना आठवले म्हणाले की, ’बिर्ला हे अनुभवी व्यक्ती आहेत. ते कधीच हसत नाहीत. परंतु मी तुम्हाला सभागृहात raहसवणार असल्याचे सांगत आठवले यांनी त्यांचे स्वागत केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here