किचनमधील कानमंत्र

मैत्रिणींनो, एक बिझी आई, कर्तव्यदक्ष गृहिणी, वर्किंग वुमन अशा नाना जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्या सगळ्यांनाच तारेवरची कसरत करावी लागते. “स्वयंपाकघर’ घरातील असा भाग जिथे आपली 24 तास निर्विवाद सत्ता असते. अशा या जागेची स्वच्छता पुढील सोपे आणि सहज उपाय अमलात आणून तुम्ही पटकन करू शकता.

किचन टिप्स
कॅबिनेट – कॅबिनेटसवर लागलेले तेलाचे डाग ऑलिव्ह ऑईलचा वापर करून सहज स्वच्छ करता येऊ शकतात. टिशू पेपरवर Olive oil चे काही थेंब घ्या आणि तेलाचे डाग मिटवा.

फ्रीज – सततच्या हाताळण्याने फ्रीजचे दार तेलकट, मळकट होते. उकडलेल्या बटाट्यांच्या सालांनी ते पटकन स्वच्छ होते.

डायनिंग टेबल – सुती कापडावर निलगिरीचे 4-5 थेंब टाकून टेबल पुसल्यास काच तर स्वच्छ होतेच आणि दुर्गंधीही जाते.

नळ –किचनमधील नळ टूथपेस्ट लावून, घासून, गरम पाण्याने धुतल्यास चकचकीत होतात.

डस्टबिन – डस्टबिन ठेवण्याची जागा फिनेलने वरचेवर पुसून घ्यावी. डस्टबिन बॅग ठेवण्यापूर्वी वर्तमानपत्राचा कागद तळाशी ठेवावा व डांबर गोळी त्यात टाकावी म्हणजे दुर्गंध येणार नाही.

खिडकी आणि दार – फोडणीचे तेलकट डाग पडून किचनमधील खिडकी, दार खराब झाल्यास गरम पाण्यात पेपर बुडवून त्याने काच स्वच्छ करावी. पटकन स्वच्छ होते.

– शैलजा गोडांबे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here