जैशचा दहशतवादी दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात

नवी दिल्ली – पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा एक सदस्य दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. बशीर अहमद असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. जवळपास पाच वर्षांपासून तो सुरक्षा आणि तपास यंत्रणांना गुंगारा देत होता.

दिल्लीत 2007 मध्ये एक चकमक घडली. त्यावेळी जम्मू-काश्‍मीरचा रहिवासी असणाऱ्या अहमद याच्या समवेत अब्दुल गफूर या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्या दहशतवाद्यांविरोधात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत खटला चालवण्यात आला. विशेष न्यायालयाने 2013 मध्ये अहमदला आरोपमुक्त केले.

मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने 2014 मध्ये तो निकाल फिरवत अहमदला दोषी ठरवले. त्या निकालापासून अहमद फरार होता. त्याच्या अटकेसाठी उपयुक्त ठरणारी माहिती मिळवण्याच्या उद्देशातून दोन लाख रूपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. अखेर अहमदला श्रीनगरमध्ये पकडण्यात यश आले. आता त्याला उच्च न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा भोगण्यासाठी दिल्लीला आणले जाईल. फरार असल्याच्या काळात अहमद कुठल्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता का, याचाही तपास केला जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)