आयसीसीने केली धोनी-सरफराजची तुलना; भारत-पाक चाहत्यांमध्ये जुंपली  

नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिज फलंदाजांची अक्षरशः भंभेरी उडाली. भारताने प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिज संघापुढे ठेवलेल्या २६९ धावांच्या वाजवी लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला धावफलकावर १५० धावा देखील जमवता आल्या नाहीत. वेस्ट इंडिजच्या प्रमुख खेळाडूंनीच स्वस्तात नांगी टाकल्याने शेवट या सामन्यामध्ये भारताने १२५ धावांनी विजय मिळवत सामना आपल्या खिशात घातला. भारताच्या या विजयानंतर आयसीसी व्हिडीओ ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये पाकिस्तान आणि भारताची तुलना करण्यात आली आहे. या व्हिडीओवरून पाकिस्तानी संघ आणि आयसीसी पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत.

या सामन्यात यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीनं २७व्या षटकात अप्रतिम झेल टिपला. वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रॅथवेटचा तो झेल होता. जसप्रीत बुमराहनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज बांधण्यात ब्रॅथवेट अपयशी ठरला आणि चेंडू बॅटची किनार घेत धोनीच्या दिशेनं वेगानं गेला, धोनीनं उजव्या दिशेला डाईव्ह मारत चेंडू झेलला आणि ब्रॅथवेटला माघारी जावं लागलं. तर काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही पाकिस्तानचा कर्णधार व यष्टिरक्षक सरफराज अहमदने असाच झेल टिपला होता. रॉस टेलरच्या त्या झेलनंतर सरफराजचे कौतुकही झाले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं धोनी आणि सरफराज यांच्या त्या झेलचा व्हिडीओ शेअर केला आणि यापैकी सर्वोत्तम झेल कोणता असा सवाल केला. त्यावरून धोनी व सरफराज यांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलीच जुंपली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)