#HBD Nawazuddin : “कभी कभी लगता है अपुन ही भगवान है”

बॉलिवूड मध्ये आपल्या मेहनीतीच्या जोरावर स्थान मिळवणारा अभिनेता ‘नवाजुद्दीन सिद्दीकी’चा आज म्हणजेच 19 मे ला वाढदिवस आहे. उत्तर प्रदेश मधील बुढ़ाना सारख्या एका छोट्याशा गावात त्याचा जन्म झाला.अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या नवाझने त्याच्या हिमतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नवाजुद्दीनचा बॉलिवूडमधील प्रवास अतिशय खडतर होता. त्याने अनेक चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या असून, त्याने अभिनेता अमीर खान याच्या ‘सरफरोश’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने रामगोपाल वर्मा यांच्या ‘शूल’ आणि ‘जंगल’ या सिनेमात काम केलं. तसेच नवाझने राजकुमार हिरानी आणि अभिनेता संजय दत्त याच्या ‘मुन्ना भाई- एमबीबीएस’ या सिनेमात सुद्धा काम केलं आहे.

एवढेच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तो चित्रपटांमध्ये झळकला आहे. नवाजुद्दीनचा कुटुंबातील कोणाचाच या इंडस्ट्रीशी संबंध नव्हता. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पण तरीही अभिनयक्षेत्रात यायचे असे त्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते. नवाझने चित्रपटांबरोबरच वेबसिरीज मध्ये देखील आपल्या जोरदार अभिनयाची छाप सोडली आहे. नवाझने आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयातून आणि भूमिकांमधून चाहत्यांच्या मनात एक वेगळे घर निर्माण केले आहे. त्यामुळेच आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये नवाझचे नाव अभिमाने घेतले जाते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)