पाकिस्तानशी दृढ लष्करी संबंध ठेवा

अमेरिकन लष्कराची प्रशासनाला सुचना

वॉशिंग्टन- अमेरिकेने पाकिस्तानशी अत्यंत दृढ आणि भक्कम लष्करी संबंध प्रस्थापित केले पाहिजेत अशी सुचना अमेरिकन लष्कराच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकन सरकारला केली आहे. अमेरिकन लष्कराचे प्रमुख जनरल मार्क मिलेय यांनी संसदेच्या लष्करी सेवा समितीला दिलेल्या लेखी पत्रात ही सुचना केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की आपण पाकिस्तानला दिली जाणारी सुरक्षा विषयक मदत कमी केली आहे. तसेच त्यांच्याशी आपण संरक्षण विषयक बाबींवरील चर्चेची प्रक्रियाही बंद केली आहे. तथापी त्या देशाशी चांगले लष्करी संबंध राखणे अमेरिकेच्याही हिताचे आहे असे त्यांनी या समितीला कळवले आहे.

अफगाणिस्तान, अलकायदा आणि अन्य घटकांशी संघर्ष करताना पाकिस्तान हा अमेरिकेसाठी एक महत्वाचा देश आहे असेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने अमेरिकेने व्यक्त केलेल्या अपेक्षा पुर्ण केल्या पाहिजेत असा आपला आग्रह राहील पण पण त्याच वेळी त्या देशांशी आपले चांगले लष्करी संबंध राहतील यासाठीही आपण प्रयत्नशील राहु असे त्यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानातील स्थिती सुधारण्याच्या कामातही पाकिस्तानने महत्वाचे योगदान दिले आहे असे त्यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)