अकरावी प्रवेश : पुणे विभागात 73 हजार अर्ज दाखल 

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी आत्तापर्यंत 73 हजार 843 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल आहेत. यातील 57 हजार 809 अर्जांची पडताळणी प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी 27 मे पासून संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दहावीचा निकाल नुकताच लागला असून लवकरच अर्जाचा भाग-2 भरण्याचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबाबतचे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यातील एकूण सहा विभागांसाठी 3 लाख 30 हजार 526 अर्जांची नोंदणी झाली आहे. 1 लाख 28 हजार 817 अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. 1 लाख 35 हजार 33 अर्जांची स्वयंचलित यंत्रणेद्वारे पडताळणी पूर्ण झाली आहे.
अद्याप 66 हजार 676 अर्जांची तपासणी होणे बाकी आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे. पुणे विभागात दाखल झालेल्या एकूण अर्जापैकी 16 हजार 34 अर्जांची अद्याप पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. उर्वरित सर्व अर्जांची तपासणी झालेली आहे. मुंबई महापालिका हद्दीसाठी 1 लाख 87 हजार 304 ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत.

राज्यात सर्वाधिक अर्ज या मुंबई क्षेत्रात दाखल झाले आहेत. यातील 35 हजार 984 अर्जांची तपासणी करायचे शिल्लक आहे. नाशिक विभागात 23 हजार 381 अर्जांची नोंदणी झाली असून यातील 20 हजार 8 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. 3 हजार 373 अर्जांची पडताळणी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. नागपूर विभागात 27 हजार 2 अर्ज दाखल झाले असून यातील 20 हजार 289 अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. 6 हजार 713 अर्जांची तपासणी अद्यापही बाकीच आहे. अमरावतीत 7 हजार 191 अर्जांची नोंदणी झाली आहे. यातील 5 हजार 611 अर्जांची तपासणी झाली आहे. 1 हजार 580 अर्जांची तपासणीचे काम अपूर्ण आहे. औरंगाबादमध्ये 11 हजार 805 अर्ज दाखल झाले आहेत. यातील 8 हजार 813 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. 2 हजार 992 अर्जांची तपासणी बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)