कुरुळी उपसरपंचपदाची आज निवडणूक

चिंबळी – कुरुळी (ता. खेड) येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदाची निवडणूक मंगळवारी (दि. 16) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी छाया इरणक यांनी दिली.

ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने उपसरपंच सुभद्रा सोनवणे यांनी स्वखुशीने उपसरपंचपदाचा राजीनामा दिला असल्याने या रिक्‍तजागेसाठी ग्रामपंचायत सभागृहात सरपंच बाळासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात येणार आहे. ठरल्याप्रमाणे विजय कांबळे यांच्या गळ्यात उपसरपंचपदाची माळ पडणार असल्याचे बोलले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)