दुबईच्या राजांची पत्नी 31 दशलक्ष पाऊंड घेऊन फरार

लंडन येथे जाण्यास जर्मन दुतावासाकडून मदत

लंडन – संयुक्त अरब अमिरातचे (युएई) पंतप्रधान आणि दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांची सहावी पत्नी हया बिंत अल हुसेन या आपल्या दोन मुलांसह 31 दशलक्ष पौंड इतकी रक्कम घेऊन देश सोडून गेल्या आहेत. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती स्थानीक प्रसिद्धी माध्यमांनी दिली आहे. मात्र, त्यांच्या पलायनावरुन जर्मनी आणि युएई या दोन देशांत तणाव वाढण्याची शक्‍यता आहे. कारण जर्मन दुतावासाने हया बिंत यांना देशाबाहेर पडण्यासाठी मदत केल्याची चर्चा आहे. हया यांना परत पाठवा अशी मागणी दुबईचे राजे शेख मोहम्मद यांनी जर्मन सरकारकडे केल्याचे समजते. मात्र त्यांना परत पाठवण्यासाठी जर्मन सरकारने विरोध केला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुबईचे राजे शेख मोहम्मद यांच्याकडे हया यांनी तलाक मागितला आहे. मात्र अद्याप दोघांचा तलाक झालेला नाही. हया जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची सावत्र बहीण आहे. देश सोडल्यानंतर हया यांनी आश्रयासाठी जर्मनीकडे विनंती केली आहे. हया यांनी ऑक्‍स्फर्ड विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेले आहे. दरम्यान दुबईच्या शाही घराण्यातून महिलेने पलायन करण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी शेख मोहम्मद यांची मुलगी राजकुमारी लतीफाने देश सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिला भारतीय तटरक्षक दलाने गोवा येऊन पकडून दुबईला परत पाठवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)