अभिनेता हृतिक रोशनविरोधात फसवणुकीचा गुन्हा

हैदराबाद – बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनविरोधात हैदराबाद पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हृतिक ब्रॅंड ऍम्बेसेडर असलेल्या “कल्ट.फीट’ जिमचा सदस्याने केलेल्या तक्रारीनंतर हृतिकसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फिटनेस सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जणांना सदस्यत्व देऊन नोंदणीच्या वेळी वेळापत्रक पाळण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप शशिकांत नामक व्यक्तीने केला आहे. याविरोधात आवाज उठवल्यानंतर ऍपद्वारे टाईम स्लॉट बूक करण्यापासून आपल्याला रोखल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर हृतिक रोशन आणि “कल्ट.फीट’ जिमच्या तिघा अधिकाऱ्यांविरोधात केपीएचबी कॉलनी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)