लग्न मोडण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर अखेर गुन्हा दाखल

पिंपरी – तरुणीला वारंवार त्रास देऊन तिचे लग्न मोडण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

आशिष रामराव लांडे (वय-26, रा. लांडे चौक, कासारवाडी) असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष हा तिचा वारंवार पाठलाग करुन त्रास देत होता. तिने त्याला नकार देऊनही तो पीडितेचे ठरलेले लग्न मोडून टाकीन व पुढे कोठेही तुझे लग्न ठरु देणार नाही अशी धमकी देत असे. या त्रासाला कंटाळून अखेर तिने पोलिसांत धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)