बारामती( प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी बारामती शहर व तालुका यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस ,प्रशासन व भाजीपाला विक्रेत्यांसह गरजूंना कोरोनच्या पार्श्वभूमीवर हातमोजे ,मास्क तसेच मिनरल वॉटरचे वितरण करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या फाईट फ़ॉर कोरोना या चळवळीत सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी यावेळी केले.
गेल्या दोन महिन्या पासून जगामध्ये पर्यायाने भारतात देखील कोरोना या महा भयंकर रोगाने जगाला विळखा घालत संपूर्ण मानव जातीला धोका निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि 22 )रोजी संपूर्ण भारतीय नागरिकांना केलेल्या जनता कर्फ्यू च्या आव्हान ला प्रचंड प्रतिसाद देऊन संपुर्ण भारत स्वयंस्फूर्ती ने बंद ठेवला.
आजारची भीषणता पाहता त कोरोना आटोक्यात येत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसा करिता भारता मध्ये लॉकडाउन केले आहे. यामुळे नागरिकांना घराचे बाहेर येता येणार नसल्याने अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. त्यांच्या मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे.
कोरोना या संसर्गजन्य महा आजारा वर मात करणे करिता चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे शहराध्यक्ष सतीश फाळके यांच्या वतीने बारामती शहर व तालुक्यात पोलीस ,प्रशासन व भाजीपाला विक्रेत्यांसह गरजूंना हातमोजे, मास्क तसेच मिनरल वॉटरचे वितरण करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाय योजना करण्यात येणार असल्याचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोठे यांनी सांगितले. शहर व तालुक्यातील भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या फाईट फ़ॉर कोरोना या चळवळीत सहभागी होऊन आपले योगदान द्यावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अविनाश मोटे यांनी केले.