नायर इगल्स्‌, शिवनेरी लायन्स्‌ संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

लायन्स्‌ प्रिमियर लीग अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे – नायर इगल्स्‌ आणि शिवनेरी लायन्स्‌ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या लायन्स्‌ क्‍लब डिस्ट्रीक 323 डी-2 तर्फे आयोजित “लायन्स्‌ प्रिमियर लीग अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

येथील नेहरू स्टेडियम मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत धीरज कदम याने केलेल्या 47 धावांच्या जोरावर नायर इगल्स्‌ संघाने कलाटे वॉरीयर्स संघाचा 7 धावांनी पराभव केला. नायर इगल्सचा हा सलग तिसरा विजय ठरला. नायर इगल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 171 धावा उभ्या केल्या. यामध्ये धीरज कदम (47), नितेश गुंदेचा (38), अभिषेक मोहीते (26) व विशाल बामे (22) यांनी संघाला एकशे सत्तर धावांचा टप्पा गाठून दिला. याला उत्तर देताना कलाटे वॉरीयर्सचा डाव 20 षटकात 3 गडी बाद 164 धावांवर मर्यादित राहीला. सौरभ रवालिया (68), कुणाल शिंदे (43) व अविनाश बारणे (38) यांची झुंझ अपयशी ठरली.

तर, दुसऱ्या सामन्यात शिवनेरी लायन्स्‌ संघाने राठोड रॉयल्स्‌ संघाचा 8 गडी आणि 5.4 षटके राखून सहज पराभव केला. यावेळी, राठोड रॉयल्स्ने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 136 धावा केल्या. हिकांत कामदार (37), महावीर ओस्वाल (19) व संतोष देवकर (19) यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. शिवनेरी लायन्स्‌ या आव्हानाचा पाठलाग 14.2 षटकात व 2 गडी गमावून पूर्ण केला. दर्शित मोदी (73) व योगेश भोंगळे (28) यांनी 24 चेंडूत 50 धावांची भागिदारी करून विजयाचा पाया रचला. दर्शितने सामन्याची सुत्रे आपल्याकडे घेत संघाचा विजय साकार करत संघाला उपांत्य फेरीत पोचवले.

संक्षिप्त धावफलक :

सामना 1) नायर इगल्सः 20 षटकात 5 गडी बाद 171 धावा (धीरज कदम 47 (31, 5 चौकार), नितेश गुंदेचा 38 (34, 3 चौकार), अभिषेक मोहीते 26, विशाल बामे 22, सौरभ रवालिया 2-25) वि.वि. कलाटे वॉरीयर्सः 20 षटकात 3 गडी बाद 164 धावा (सौरभ रवालिया 68 (55, 9 चौकार), कुणाल शिंदे 43 (47, 4 चौकार, 1 षटकार), अविनाश बारणे 38 (16, 2 चौकार, 3 षटकार), राजु कोतवाल 2-41); सामनावीरः धीरज कदम.

सामना 2) राठोड रॉयल्सः 20 षटकात 6 गडी बाद 136 धावा (हिकांत कामदार 37 (39, 1 चौकार), महावीर ओस्वाल 19, संतोष देवकर 19, योगेश भोंगळे 2-19) पराभूत वि. शिवनेरी लायन्सः 14.2 षटकात 2 गडी बाद 137 धावा (दर्शित मोदी 73 (44, 6 चौकार), योगेश भोंगळे 28 (15, 4 चौकार), संतोष पाटोळे 18);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी दर्शित आणि योगेश यांच्यात 50 (24 चेंडू); सामनावीरः दर्शित मोदी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)