गोव्यात विवाह नोंदणीसाठी एचआयव्ही टेस्टची सक्ती

पणजी – गोव्यात नवविवाहितांना आपल्या विवाहाची नोंदणी करण्यापुर्वी एचआयव्ही चाचणी करणे बंधनकारक केले जाणार आहे. राज्य सरकारचा तसा विचार आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली. त्यासंबंधीचा अधिकृत प्रस्ताव लवकरच विधीमंडळात सादर केला जाणार आहे असे त्यांनी आज पत्रकारांना सांगितले.

या आधीही सन 2006 मध्ये तत्कालिन कॉंग्रेस सरकारने असा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला समाजातील विविध घटकांनी तसेच राजकीय पक्षांनीही विरोध केला होता. आता पुन्हा त्याच विरोधाचा सामना भाजप सरकारलाही करावा लागू शकतो. त्यामुळे त्यांना हा कायदा करण्याच्या आधी त्याविषयी मोठी जनजागृती करावी लागणार आहे. राणे म्हणाले की या विधेयकाचा मसुदा विधी मंत्रालयाकडे सोपवण्यात आला आहे. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर त्यावर आम्हीं निर्णय घेणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)