रिक्षाचालकांविरुद्ध उदंड झाल्या तक्रारी

गेल्या 6 महिन्यांत तब्बल 167 प्रकरणे

येथे करा तक्रार
रिक्षाचालकांनी भाडे नाकारल्यास किंवा प्रवाशांशी उद्धटपणे वागल्यास प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा. आरटीओ अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी, एमएच.12 ऍट महाट्रान्सकॉम.इन या ईमेलवर अथवा टोल फ्री क्रमांकावर (1800-233-0012) रिक्षाचालकांबाबत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.

पुणे – शहरामध्ये दिवसेंदिवस रिक्षांची संख्या वाढत आहे. पर्यायाने रिक्षाचालकांबाबत करणाऱ्या येणाऱ्या तक्रारींची संख्या देखील वाढत आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये 167 रिक्षाचालकांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत.

प्रवाशांची इच्छित स्थळी पोहोचण्याची घाई पाहता रिक्षाचालक जादा भाडे आकारतात, शहरातील विविध भागांनुसार बदलणारे भाडे, प्रवाशांना उलट सुलट उत्तरे देणे, जादा प्रवाशांची वाहतूक करणे आदी प्रकार वारंवार घडतात. शहरामध्ये सुमारे 60 हजार रिक्षा धावतात. त्यापैकी बहुतांश रिक्षाचालकांचा मनमानी कारभार, प्रवाशांसह हुज्जत, भाडे नाकारणे, नियमांचे पालन न करणे, जादा प्रवाशांची वाहतूक करणे आदी तक्रारी वाढत आहेत.

रिक्षाचालकांविरोधात करणाऱ्या आलेल्या तक्रारींबाबत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत उपप्रादेशिक कार्यालयांना देखील कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाईसह परवाने (लायसन्स), वाहन परवाना (परमिट) निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here