चीनमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का

बिजींग – चीनमधील दक्षिणेकडील सिचुयान प्रांताला आज भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी होती. या भूकंपामुळे झालेल्या घरांच्या पडझडीमध्ये 31 जण जखमी झाले. स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भामध्ये 10 किलोमीटरवर होता असे चीनच्या भूकंप मापक केंद्राने म्हटले आहे.

या भूकंपाच्या मुख्य धक्‍क्‍यानंतर गोंग्झियान प्रांताला भूकंपाचे अनेक छोटे छोटे धक्के जाणवले. त्यात यिबिन येथे सकाळी 8.25 वाजता आणखी एक धक्का जणवल्याचे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. भूकंपामुळे पडझड झालेल्या गावांमध्ये मदत पथके रवाना करण्यात आली आहेत. धोकादायक घरे रिकामी करण्यात येत असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

17 जून रोजी 6 रिश्‍टर तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल होता. त्यामध्ये 12 जण मरण पावले होते, तर 220 जण जखमी झले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी चांगनिंग प्रांतालाही 5.3 रिश्‍टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here