विकास आराखडा बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार

चाकण नगरपरिषद प्रशासनाची भूमिका लेखी पत्राने स्पष्ट

चाकण – चाकण नगरपरिषदेच्या चाकण विकास आराखडा बैठकीवर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला आहे. याबाबत लेखी पत्राने भूमिका स्पष्ट केली आहे.

विविध वृत्तपत्रांत विकास आराखडा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या मागील आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या आहे. एकंदर नगररचना विभागाने शासनाने कायमस्वरूपी बदलीने सहायक संचालक म्हणून महिला अधिकारी श्रीमती सुर्वे यांची नेमणूक मार्च-2019 मध्ये केलेली असताना त्यास संचालक नगररचना श्री. शेंडे यांनी स्थगिती देऊन अतिरिक्त कारभार असलेल्या विजय शेंडे यांच्याकडे सहायक संचालक, नगररचना पुणे हा कार्यभार कायम ठेवला. काही कारण नसताना विजय शेंडे यांनी गेली एक वर्ष चाकण विकास आराखडा प्रक्रियेवर काम केले आहे. आता त्यांच्या जागी नवीन अधिकारी आल्यानंतर त्यास स्थगिती देऊन विजय शेंडे यांच्या हस्तेच प्रक्रिया राबविण्यामागे संशयास्पद व गैरकारभार असून भ्रष्टाचार झाला आहे.

यात तथ्य असून मनमानी आरक्षण टाकून इतर प्रक्रिया झालेल्या असून यातच नगरपरिषदेचा कारभार विविध कारणाने बदनाम झालेला आहे. त्यात विकास आराखडा प्रक्रियेत वरील वस्तूस्थिती व परिस्थिती लक्षात घेता सत्ताधारी व प्रशासनावर अविश्‍वास विरोधी पक्षांचा निर्माण झालेला आहे, महत्वाचे म्हणजे झालेल्या विकास आराखडा आरोपात तथ्य असूनदेखील नगरपरिषद सत्ताधारी व प्रशासन हे घाईगडबडीत विकास आराखडा प्रसिद्ध करत असून या भ्रष्टाचारात विरोधी पक्ष सामील असल्याचे भासवविण्याचा प्रयत्न करत आहेत. यास्तव आम्ही बहिष्कार टाकून निषेध नोंदवित आहे. आमच्या निवेदनाप्रमाणे मागणी मान्य व्हावी तसेच याप्रकरणी सहायक संचालक विजय शेंडे यांचा अतिरिक्त कारभार काढून शासनाने बदलीने कायमस्वरूपी नेमण्यात आलेल्या सहायक संचालक श्रीमती सुर्वे यांचेकडूनच सर्व विकास आराखडा प्रक्रिया राबवावी.

महत्वाचे म्हणजे एकात्मिक विकास आराखडा करणेबाबत चाकण नगरपरिषद हद्दवाढ रिट याचिका 9760/2019 अन्वये परवानगी घेऊन प्रक्रिया व्हावी जेणेकरून जनतेच्या पैशांची दुहेरी प्रक्रियेवर उधळपट्टी होणार नाही, ही वस्तुस्थिती सत्य असून दि. 5 जुलैच्या विशेष सभेवर नगरपरिषदेचा भ्रष्ट व दिशाहीन कारभार, महिला अधिकारी अपमान, उच्च न्यायालय याचिका, पैशाची दुहेरी प्रक्रियेवर उधळपट्टी, संशयासस्पद विकास आराखडा नगरपरिषदेकडे येण्यापुर्वीच फुटलेला असून, सदोष आहे. ही चर्चा शहरभर असून या कारणाने सत्ताधारी व प्रशासन यांचेवर अविश्‍वास निर्माण झाल्याने आम्ही सामूहिक बहिष्कार व निषेध नोंदवत आहोत.

या पत्राची नोंद सभेच्या इतिवृत्तात घ्यावी असे निवेदन विरोधी पक्ष नेता जीवन सोनवणेसह नगरसेवक प्रकाश भुजबळ, नगरसेविका अनिता कौटकर, संगिता बिरदवडे, वृषाली देशमुख, अश्‍विता कुऱ्हाडे, स्नेहा भुजबळ, मेनका बनकर व भाजपा नगरसेविका सुरेखा गालफाडे यांनी स्वतंत्र निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना दिले आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राम गोरे व आनंद गायकवाड व नागरिकांनी विकास आराखडा प्रक्रियेवर संशयास्पद असल्याबाबत निवेदन दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)