नवी दिल्ली – भारताची अनुभवी महिला बॉक्सर मेरी कोमने दहाव्या महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 48 किलो वजनी गटात मेरी कोमने उपांत्य फेरीच्या सामन्यात उत्तर कोरियाच्या किम ह्यांग-मीचा पराभव केला. या कामगिरीसह मेरी कोमने अंतिम फेरीत प्रवेश केला असून सुवर्णपदकाची आशा निर्माण केली आहे.
पाच वेळा विश्व चॅम्पियन झालेल्या एम. सी. मेरीकोम जर अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकले तर ती सहा वेळा सुवर्ण जिंकण्याचा विक्रम तिच्या नावावर जमा होउ शकतो.
आयर्लंडच्या केटी टेलर आणि मेरी कोम यांच्या नावावर विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेची प्रत्येकी 5 सुवर्णपदकं जमा आहेत. यंदाच्या स्पर्धेत पदक मिळाल्यास मेरी केटी टेलरचा विक्रम मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0