शिमला : हिमाचल प्रदेशातील बर्याच भागात गुरुवारी थंडीचा प्रादुर्भाव सुरूच राहिला. हिमाचल प्रदेशात किमान तापमान शून्याच्या खाली गेले आहे. रविवारपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, अशी हवामान विभागाने वर्तवली आहे.
शिमला येते ०.७ तापमानाची नोंद करण्यात आली. प्रसिद्ध पर्यटन स्थळ मनाली येथे किमान तापमान 2.२ अंश नोंदविले गेले आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुम्बा, फागु, नरकंडा, चंबा आदी पर्यटन स्थळे बर्फाच्छादित आहेत.