बीसीसीआयने केली गांगुलीची पाठराखण

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लोकपाल डी. के. जैन यांनी बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरभ गांगुलीच्या दुहेरी हितसंबंधांप्रकरणी शनिवारी सुनावणी घेतली. या वेळी बीसीसीआयने ठामपणे गांगुलीची बाजू घेतली असून, जैन यांनी गांगुलीकडे सदर प्रकरणी लेखी स्पष्टीकरण मागितले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) गांगुलीची पाठराखण करण्यात येत असून हितसंबंधाचा वाद हा सोडवता येणे शक्‍य असल्याचे म्हटले आहे. शांतुआ, मुखर्जी आणि सील या तीन चाहत्यांनी गांगुलीविरोधात दावा केला. बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष भूषवताना गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या सल्लागाराच्या भूमिकेत कार्यरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे गांगुलीकडून हितसंबंध जोपासले जात असल्याबाबत या तिघांनी आक्षेप घेत “बीसीसीआय’कडे तक्रार केल्यानंतर त्यांनी लवाद अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण सोपवले आहे. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर दोन्ही पक्षकारांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)