बाजाराचं भवितव्य सांगणारा गोल्डन क्रॉस (भाग-२)

बाजाराचं भवितव्य सांगणारा गोल्डन क्रॉस (भाग-१)

दीर्घकालीन चलत सरासरीस जास्त महत्त्व असतं याचं कारण की मागील २०० दिवसांच्या दैनिक मूल्याची ती सरासरी असते. त्यामुळं लहान सहान दोलायमान कंपनांमुळं ती सहज बदलू शकत नाही. त्यामुळं गोल्डन क्रॉस हा मध्यम-दीर्घ कालावधीसाठी एक कलबदल दर्शवतोजो निर्देशांकासाठी दिशादर्शकाचं काम करू शकतो. त्याचप्रमाणं, त्याअनुषंगानं बाजारास अनुसरणाऱ्या कंपन्यांची खरेदी करून देखील फायदा पदरात पडून घेता येऊ शकतो. अशा या गोल्डन क्रॉसओव्हरमुळं निफ्टीसाठी दीर्घ मुदतीकरिता टप्प्याटप्प्यानं उद्दिष्टं ही १२१४६, १२३९०, १२५७७, १३०८० व १३३९० वाटत असून त्यासाठी १११००, १०९५० व १०५०० या आधार पातळ्या विचारात घ्याव्याशा वाटतात. अर्थातच निवडणुकीनंतरचा काळ बघता हे गोल्डन क्रॉसओव्हर अबाधित राहतंय का हे देखील वरचेवर तपासत राहणं गरजेचं आहेच.

८ एप्रिलच्या लेखात पॉलीकॅबच्या प्राथमिक समभाग विक्रीसाठी अर्ज करावा असं सुचविलं होतं. अपेक्षेप्रमाणं या शेअरला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळं या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी ६३३ रुपयांवर म्हणजे प्राथमिक समभाग विक्री किंमत पट्ट्यातील सर्वोच्च भावापेक्षा (कट-ऑफ)तब्बल ९५ रुपये वरती झाली व त्या दिवसाचा उच्चांक होता ६६७.८० म्हणजेच २४ टक्के परतावा, तो देखील मोजून आठच दिवसांत. अजून एक शेअर मागील आठवड्यात चर्चेत राहिला तो म्हणजे जेट एअरवेज. जेट एअरवेज कंपनीनं पुन्हा बँकांकडं उड्डाणसेवा चालू ठेवण्यासाठी आधी १५०० कोटी रुपये,  मग १००० कोटी रुपयांची मागणी केली परंतु आधीच ८००० कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या कंपनीस कोणतेही नवीन आर्थिक सहाय्य करण्यास बँकांनी असमर्थता दर्शवल्यानं नाइलाजानं कंपनीस आपली उड्डाण सेवा १७ एप्रिल पासून बंद ठेवावी लागली. या बातमीमुळं दुसऱ्याच दिवशी जेट एअरवेजचा शेअर ३१.४६ % कोसळला. या प्रकारची कुणकुण आधीच असल्यानं त्याआधीच्या दिवशी म्हणजे १६ एप्रिल रोजी हाच शेअर ८ % पडलेला होता,  म्हणजे दोनच सत्रांत जवळपास ४० टक्क्यांची घसरण. याउलट पीसी ज्वेलर्सचा शेअर मागील आठवड्याततब्बल ५० टक्क्यांहून अधिक वधारला. मागील तिमाहीतील निराशाजनक निकालानंतर गेल्या सप्ताहात हा शेअर चमकला तो म्हणजे कार्लिना या कंपनीनं पीसी ज्वेलर्समध्ये हिस्सा घेतलाय या बातमीमुळं. या कंपनीनं पीसी ज्वेलर्सच्या एकूण सदतीस लाख शेअर्सची खरेदी केल्यामुळं हा शेअर मागील आठवड्यात चर्चेचा विषय ठरला.

एकूणच चालू असलेल्या मतदानाची रणधुमाळी, त्यानंतर एक्झिट पोलचे निवडणूक निकालांपासून ते थेट सरकार स्थापनेपर्यंतचे अंदाज व सरतेशेवटी प्रत्यक्ष वर्तमान यांवर बाजाराचं भवितव्य बऱ्याच प्रकारे अवलंबून आहे. त्यामुळं प्रत्येक घडामोडीनंतर बाजार जसजशी वळणं घेईल तसतशा आपल्या स्ट्रॅटेजींमध्ये  धोरणात्मक बदल करून गुंतवणुकीची अथवा फायदा पदरात पडून घ्यायची संधी हेरत राहणं हेच काय ते आपल्या हातात आहे, नाही का ?

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.