बच्चन पिता-पुत्राची पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर टक्कर 

बॉलिवूडमध्ये दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणे आता सामान्य गोष्ट बनली आहे. परंतु, पहिल्यांदाच वडील आणि मुलाच्या चित्रपटाची टक्कर बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार आहे. अमिताभ बच्चन यांचा चित्रपटाचा सामना अभिषेक बच्चनच्या चित्रपटाला करावा लागणार आहे. यामध्ये मुलाचा चित्रपट सरस ठरतो का वडील बाजी मारतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अभिषेक बच्चन याच्या अॅक्शन-कॉमेडी चित्रपटाची शूटिंग चालू आहे. परंतु, अद्याप या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली नाही. वृत्तांनुसार, अभिषेक बच्चनसोबत राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, सान्या मल्होत्रा, पंकज त्रिपाठी आणि फातिमा सना शेख यांच्या महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. पुढील वर्षी २१ फेब्रुवारी रोजी अभिषेक बच्चन याचा अॅक्शन-कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होईल. मात्र याच दिवशी अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चेहरे या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत इम्रान हाश्मीही झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रुमी जाफरी करत आहेत. दरम्यान, दोन्ही चित्रपटाटाची संभाव्य प्रदर्शनाची तारीख एक असली तरीही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)