‘पुरंदर’साठी दोन विकास आराखडे

आंतरराष्ट्रीय विमानतळ : आराखडा 6 महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना

पुणे – पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्या लागतच्या सुमारे 800 हेक्‍टर जागा, असे दोन स्वतंत्र विकास आराखडा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) तयार करण्यात येणार आहेत.

पुरंदर येथे विमानतळ उभारण्यासाठी सुमारे 2 हजार 832 हेक्‍टर जागा लागणार आहे. या कामासाठी विमानतळ विकास कंपनीला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. 2 हजार 832 हेक्‍टरपैकी 2 हजार हेक्‍टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारण्यात येणार आहे. विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम यापूवी “डार्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. तर उर्वरित 832 हेक्‍टर जागेवर विमानतळासाठी आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकास आराखडा कंपनीकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यास यापूर्वी राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार निविदा काढून हे काम आंतराष्ट्रीय दर्जाच्या “लि असोसिएट’ या कंपनीला देण्यात आले आहे.

याविषयी माहिती देताना एमएमडीसीचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी म्हणाले, “प्रत्यक्षात विमानतळासाठी विमानतळासाठी दोन हजार हेक्‍टर जागा लागणार आहे. त्यांचा मास्टर प्लॅन “डार्स’ या कंपनीकडून तयार करण्यात आला आहे. लवकरच तो मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. याशिवाय विमानतळालगतच्या उर्वरीत 800 एकरचे भूसंपादन कंपनीकडून संपादित करण्यात येणार नाही. परंतु त्यांचा विकास आराखडा कंपनीकडून तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी लि असोसिएट या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहा महिन्यांत आराखड्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.