अन्‌ खासदार संभाजी राजे छत्रपती मारली नदीत उडी

कोल्हापूर  – सध्या उन्हाळ्याचा ज्वर चांगलाच चढला आहे. त्यामुळे प्रचंड उष्म्याने सगळ्याच्याच अंगाची लाही-लाही होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती हे चंदगड दौऱ्यावर आहेत.
संभाजीराजे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून ते शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार दौऱ्यात आहेत. प्रचारादरम्यान वाटेत ढोलगरवाडी हंझोल नदीवरील बंधाऱ्यावर ढोलगरवाडी व पंचक्रोशीतील तरुण व बालचमू नदीत पोहण्याचा आनंद लुटत होते. राजेंच्या वाहनांचा ताफा याच बंधाऱ्यावरून जात होता.

पोहणारी मुले पाहून राजेंनाही आपले बालपण आठवले. त्यांनी आपली गाडी थांबवली. पोहण्याची इच्छा व्यक्त केली, पण सुरक्षा रक्षकांनी पोहण्याची मनाई केली. इतर मुलांचा आनंद पाहून त्यांना काही केल्या आपला मोह आवरेना. यानंतर त्यांनी कपडे काढले आणि नदीत धाडकन उडी ठोकली.

खुद्द राजेंनीच पोहण्यासाठी उडी ठोकल्याने मुलांनी जोर जोरात जल्लोष केला. राजेंच्या बरोबर पोहण्याचा आनंद साऱ्यांनीच लुटला. संभाजीराजेही कडक उन्हाने सांगलेच हैराण झाले होते. रोज-रोज तीच तीच कामे करून कंटाळलेल्या संभाजीराजेंनी नदीत पोहून चांगलाच आनंद लुटला आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here