अभिनेता वैभव मांगले यांची प्रकृती स्थीर

सांगली – माजी प्रकृती ठीक आहे. नाट्यगृहामध्ये एसी नसल्याने आणि उष्णता जास्त असल्याने मला नाटक सुरू असताना चक्कर आली असावी. आता घाबरण्यासारखे काही नाही, असे वैभव मांगले यांनी सांगितले.

मराठी अभिनेते वैभव मांगले नाटकाच्या शोदरम्यान चक्कर येऊन स्टेजवर कोसळले होते. सांगलीच्या भावे नाट्यगृहात मांगले त्यांच्या नाटकाचा शो सुरू होता. त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रूग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांचावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. सांगलीत “अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा प्रयोग सुरु असताना हा प्रकार घडला.

वैभव मांगले अचानक कोसळल्यानंतर प्रयोग थांबवण्यात आला. प्रयोगासाठी शेवटचे पाच मिनिटे उरले होते. तसेच या नाटकात मांगले यांची मुख्य भूमिका आहे. वैभव मांगले उकाड्यामुळे कोसळल्याचे अगोदर सांगण्यात आले. यानंतर डॉक्‍टरांनी स्टेजवरच त्यांची तपासणी केली असता हा हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

वैभव मांगले यांना सुरुवातीला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती निर्माते राहुल भंडारे यांनी दिली. पण त्यानंतर मांगले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांची आता प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)