उपशिक्षणाधिकाऱ्यांची 393 पदे रिक्तच!

पुणे – राज्यातील विविध विभागांत उपशिक्षणाधिकाऱ्यांची तब्बल 393 पदे रिक्त आहेत. यामुळे इतर अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडतो आहे. आता या रिक्त पदांवर टप्प्याटप्प्याने अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. त्यांना त्यांच्या पसंतीनुसार सोयीच्या विभागात नियुक्ती देण्यात येणार आहे. पदोन्नतीच्या प्रक्रियेस शिक्षण आयुक्त कार्यालयातून हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिक्षण विभागाच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बरीचशी पदे रिक्तच आहेत. यामुळे बहुसंख्य कार्यालयातील विविध प्रकरणे प्रलंबित पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अधिकारीच नसल्याने कर्मचाऱ्यांवरही कोणाचे नियंत्रण राहत नाही ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब प्रशासन शाखेमधील उपशिक्षणाधिकारी व इतर संवर्गातील खुल्या प्रवर्गातील रिक्तपदे तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने भरण्यासाठी विभागीय पदोन्नती समितीने मान्यता दिली आहे. 17 एप्रिल 2018 रोजी या समितीची बैठक झाली होती. पदांच्या रिक्ततेनुसार अधिकाऱ्यांना पसंतीक्रमाचा विचार करून विभाग वाटप करण्यात येणार आहेत. ज्या अधिकाऱ्यांना पदसंख्येनुसार पसंतीचा विभाग प्राप्त होणार नाही त्यांना चक्राकार पद्धतीने विभागाचे वाटप करण्यात येणार आहे.

पसंतीचा विभाग आजपर्यंत सादर करावा
राज्यातील महसूली विभागांनुसार नागपूरमध्ये 71, अमरावतीत 60, औरंगाबादमध्ये 75, कोकणात 104, नाशिकमध्ये 50 याप्रमाणे अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यातील रिक्त पदांवर पदोन्नतीने अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्यासाठी यादी तयार करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांकडून पसंतीचा विभाग (बंधपत्र) 22 जुलैपर्यंत सादर करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना व सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना शिक्षण आयुक्त कार्यालयातील प्रशासनाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालकांनी आदेश जारी केले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)