सुलतानपूरमध्ये अटीतटीची लढत सुरूच; मनेका गांधींना ‘किरकोळ’ आघाडी

उत्तर प्रदेशमध्ये यंदा भाजपतर्फे सुलतानपूर या लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मनेका गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून २०१४मध्ये मनेका गांधी यांचे पुत्र वरून गांधी यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते येथून निवडून देखील आले होते मात्र यंदा भाजप पक्षश्रेष्ठीनी वरून गांधींच्या सलतानपुरातून मनेका गांधींना तर मनेका गांधींच्या पिलभीत मतदारसंघातून वरुण गांधींना उमेदवारी जाहीर केली होती.

दरम्यान, आज देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असून त्यासाठी आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपच्या मनेका गांधी उभा असलेल्या सुलतानपूर लोकसभा मतदारसंघामध्ये मनेका गांधी आणि बसपाचे चंद्राभद्र सिंह यांच्यामध्ये काट्याची टक्कर सुरु असून मनेका गांधी यांनी किरकोळ आघाडी मिळाली आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार 230538 मतांसह मनेका गांधी या आघाडीवर असून त्यांच्यापाठोपाठ बसपाचे चंद्रभद्र सिंह असून त्यांना २22072 मतं मिळाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)