शिरूरमध्ये अमोल कोल्हेंचे ‘लीड’ कायम

पुणे – महाराष्ट्रातील मनाच्या ठरलेल्या लोकसभा निवडणुकांपैकी एक असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असल्याने शिरूरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांनी ४७७९१८ मतांसह आघाडी घेतली असून शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव-पाटलांच्या खात्यात आतापर्यंत ४३००७० मतं जमा झाली आहेत. अमोल कोल्हे यांना सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून ४७,८४८ मतांचे मताधिक्य असून राहिलेल्या फेऱ्यांची मतमोजणी सध्या सुरु आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×