लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात

सातारा ः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना भीमशक्तीचे पदाधिकारी. दुसर्‍या छायाचित्रात अभिवादन करताना चिमुकला. तिसर्‍या छायाचित्रात युवा स्वयंरोजगार संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर. (छाया ः संजय कारंडे)

साताऱ्यात विविध संघटनांनी केले अभिवादन
सातारा,दि.1 प्रतिनिधी- लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती सातारा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करण्यासाठी विविध संघटना प्रतिनिधी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळपर्यत अभिवादन करण्यासाठी शहरासह परिसरातील उपनगरे व गावांमधून बहुसंख्य नागरिक येताना दिसून होते. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या जयघोषाने परिसरातील वातावरणात उत्साह निर्माण झाला होता.
येथील नगरपालिका परिसरात उभारण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ परिसरात दोन दिवस अगोदरपासून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध संघटना प्रमुखांनी अभिवादनाचे फलक ही उभारले होते. त्यामुळे दोन दिवसांपासूनच अण्णाभाऊ साठेंच्या जयंती उत्सवास सुरूवात झाली होती. शहरात ठीकठीकाणी अण्णाभाऊ साठेंच्या कार्यावर प्रबोधनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते. बुधवारी जयंतीदिनी सकाळी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्यासह रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब शिरसट, युवा स्वयंरोजगार संस्थेचे सचिन अवघडे, रिपाइंचे ज्येष्ठ नेते अण्णा वायदंडे, मातंग सेनेचे अध्यक्ष पी.जी.माने, अमर गायकवाड, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण, प्रकाश फरांदे, फारूक पटणी, रिपाइं ब्ल्यु फोर्सचे दादासाहेब ओव्हाळ, वडार समाज संघटनेचे रमेश विटकर, शरद गायकवाड, सचिन वायदंडे, अप्पा तुपे, शुक्राचार्य भिसे, नवना शिंदे, संपतराव भिसे, साईनाथ खंडागळे, माजी नगरसेवक बाळासाहेब नाईक, समाज कल्याण सह.आयुक्त विजय गायकवाड, भीमशक्तीचे कार्याध्यक्ष अरूण पवार, गुलाबराव बनसोडे, राजू जेधे, ज्येष्ठ नेते वामन मस्के, राजरतन कांबळे, गजानन बाबर, अविनाश गायकवाड, मनोज सोळंकी, महारूद्र तिकुंडे, लक्ष्मण कदम, सुंदर ओव्हाळ, दयानंद नागटिळक, शंकर पवार, सुरज पवार, अलोक पवार, नयन गायकवाड, गणेश कांबळे यांच्यासह मातंग सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश आवळे, युवराज अवघडे, वालचंद जाधव, हिंदुराव शिंदे, अंगापूर ग्रमापंचायत सदस्य संतोष गायकवाड, चंद्रकांत खुडे यांच्यासह बहुंसख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शाहीरी जलसाचे आयोजन
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहीरीच्या माध्यमातून भारतीय समाजव्यवस्थेचे दु:ख, वेदना मांडल्या. आज त्यांच्या जयंतीनिमित्त रिपाइंच्यावतीने नगरपरिषदेच्या हॉलमध्ये शाहीर सचिन माळी आणि शीतल साठे यांच्या शाहीरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात जग बदल घालूनी घाव, मज सांगून गेले भीमराव यासह सादर करण्यात आलेल्या शाहीरीने श्रोत्यांचे प्रबोधन करण्यात येत होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)