वाघोली : जि. प. सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांची कोविड केअर सेंटरला भेट

कोविड सेंटरमध्ये गैरसोय असल्याबाबतच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे केले स्पष्ट

वाघोली(प्रतिनिधी) – येथील भारतीय जैन संघटना विद्यालयात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची तसेच आरोग्य यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी आज केली.

येथील सेंटरमध्ये गैरसोय असल्याबाबतच्या तक्रारी काही रुग्णांकडून करण्यात आल्या होत्या. परंतु, यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे पाहणी नंतर ज्ञानेश्‍वर कटके यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचनाही केल्या.

वाघोली(प्रतिनिधी) – येथील भारतीय जैन संघटना विद्यालयात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात…

Posted by Digital Prabhat on Tuesday, 28 July 2020

वाघोली येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत ज्ञानेश्वर कटके यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे येथे रुग्णांना योग्य उपचारांसह अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली असून याकरीता येथे पाहणी केल्याचे कटके यांनी नमूद केले. येथील कोविड केअर सेंटरमध्ये वसतीगृहात सुसज्ज यंत्रणा आहे. एकाच वेळी 250 रुग्णांवर उपचाराची क्षमता तसेच 24 तास चार सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तज्ज्ञ फिजिशियन, डॉक्‍टरांचे पथक तत्पर असून रुग्णालयात आधुनिक निर्जंतुकीकरण यंत्रणाही सज्ज आहे. रुग्णांसाठी नाष्टा, जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून स्वच्छता राखली जात असल्याचे तसेच याबाबत संबंधीत यंत्रणेस सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचेही जि.प.सदस्य कटके यांनी सांगितले. यावेळी वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड ही उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.