लीक झालेल्या “त्या’ सिनमुळे भडकली राधिका

सध्या राधिका आपटे आणि देव पटेल यांच्या “द वेडिंग गेस्ट’ या चित्रपटा मधील चित्रित एक इंटिमेट सीन इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या बाबत राधिकाने या संपूर्ण प्रकरणावर उघडपणे आपले म्हणणे मांडले असून या विषयी उत्तर देताना ती भडकली आहे. ती म्हणाली, तिच्या चित्रपटातील तो सीन इतक्‍या जास्त प्रमाणात शेयर झाला त्याचे कारण म्हणजे लोकांची विचार करण्याची पद्धत खराब आहे.

यावेळी ती पुढे म्हणाली की, या चित्रपटात इतर अनेक सुंदर सीन्स आहेत. पण केवळ हाच सीन व्हायरल झाला आहे. लीक झालेल्या सीनमध्ये पुरूष अभिनेता देव पटेलही आहे. पण हा सीन माझ्या नावाने लीक झाला आहे आणि तो पसरवण्यात आला आहे. तो देव पटेलच्या नावाने परसविण्यात आलेला नाही. या वरून लोकांची मानसिकता आपल्याला समजून येते. राधिका आपटे हॉलिवूडमध्ये ‘द वेडिंग गेस्ट’ या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करत आहे. आतपर्यंत हा चित्रपट भारतात रिलीज झालेला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)