माळीवाडा येथे मुक्ताई देवी यात्रा उत्साहात

नागरिकांनी विविध भूमिकांतून केली मतदान जागृती

ओतुर- खालचा माळीवाडा(ता. जुन्नर) येथे मुक्ताई देवी यात्रा उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. यानिमित्त खालचा माळीवाडा येथील नागरिकांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केलेली सोंगे काढून जुन्नर शहरातील जनतेला मतदार राजा जागा हो – लोकशाहीचा धागा हो, जे देशासाठी लढले ते वीर हुतात्मा झाले, धरण उशाला आणि कोरड घशाला… अशा आशयाचे संदेश देत लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा अधिकार जनतेने बजावावा यासाठी जनजागृतीसाठी मंडळाच्या वतीने पत्रकांचे वाटप करून प्रबोधन करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने ढोल-तशांच्या निनादात जुन्नर शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली होती.

खालचा माळीवाडासह ताजणेमाळा येथील नागरिकांनी मुक्ताई देवी यात्रा उत्सवानिमित्त पालखी मिरवणूक जुन्नर शहरातून काढून गोळेगाव येथील मंदिरापर्यंत नेण्यात आली. खालचा माळीवाडासह ताजणेमळा गणेशोत्सव मंडळ आणि लंबोदर ढोल-ताशा पथक मित्रमंडळातर्फे यावर्षी मतदानाचा टक्का वाढण्यासाठी व मतदानाबाबत जनजागृतीसाठी पत्रकांचे वितरण करण्यात आले. तालुक्‍याला भेडसावत असेलेली भीषण पाणी टंचाई, निवडणुकीपूर्वी होणारे पक्षांतर या विषयांवर आधारित फलक व वेशभूषा धारण केलेली सोंगे बनवून जुन्नर शहरातील प्रमुख पेठातून फेरी काढून मतदान जागृती करणारा संदेश देण्यात आला. यात्रा उत्सव यशस्वीपणे करण्यासाठी किशोर भगत, मुकेश ताजणे, साईनाथ डोके, कैलास लोखंडे, राजेंद्र गाडेकर, शैलेश बनकर, नगरसेविका, सुवर्णा बनकर, चैत्राली भगत, मुक्ताबाई गाडेकर आदींनी सहकार्य केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)