राजकारणाचे बाळकडू प्यायलेल्या पार्थ पवारांच्या रूपात देशाला युवा खासदार द्या-मुंडे

पुणे: महाआघाडीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारानिमित्त धनंजय मुंडे यांनी काळेवाडी येथील सभेस संबोधित केले. या भागाने आदरणीय शरद पवार यांना खासदार बनवले, आता पवार साहेबांच्या नातवाला आशीर्वाद देऊन त्याला तुमची सेवा करण्याची संधी द्या, असे धनंजय मुंडे म्हणाले.

ते समोर म्हणाले, या पाच वर्षातील सत्ताधाऱ्यांची मस्ती पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मदतीला अवघा मराठवाडा धावून आला आहे. मराठवाड्यातील आमचे तिन्हीही उमेदवार निवडून येतील हा विश्वास आहे. राजकारणाचे बाळकडू प्यायलेल्या पार्थ पवार यांच्या पाठिशी मावळने खंबीरपणे उभे राहून देशाला युवा खासदार द्यावा.

शरद पवार, अजित पवारांनी पुणे आणि परिसराचा विकास केल्यामुळेच मराठवाड्यातील युवक, बेरोजगार यांना इथे कामाची संधी मिळाली. त्यामुळे आता परतफेड करण्याची आपली जबाबदारी आहे. पार्थ पवार यांना मतदान करुन विश्वास आणि विकासाला तुमचा कौल द्या,असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.