खंडणीसाठी लष्कर परिसरात दुकानांची तुफान तोडफोड

तीन दुकानदारांना जीवे ठार मारण्याची धमकी
पुणे,दि.15-लष्कर परिसरात खंडणीसाठी दुकांनाची तुफान तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी चौघांना लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका वाईन शॉपवाल्याकडे दोन लाखाची खंडणी मागण्यात आली. तर तीन दुकानदारांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
आदित्य उर्फ मन्या भोसले(28,रा.भवानी पेठ), सुशील दिनेश भडकवाल(27,भवानी पेठ), संतोष उर्फ बाळा रघुनाथ गायकवाड(35,रा.मोदीखाना), डेनलील डिक्रुज जोन्स(35,रा.भवानी पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आनंद गुलाब जवारे(43,रा.गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचे लष्कर परिसरात न्यूयॉर्क वाईन्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास चौघे आरोपी तेथे दाखल झाले. त्यांनी दोन लाखाची खंडणी दे नाहीतर जीवे ठार मारेल अशी धमकी दिली. यानंतर त्यांच्या दुकानातील काचेच्या रॅकवर सिमेंट ब्लॉकने मारुन सुमारे 1 लाख 10 हजाराचे नुकसान केले. तसेच पुढे जात त्यांनी क्‍लासिक स्क्वेअर सोसायटीमदील प्रतिक धनराज जैन यांच्या दुकानातील काऊंटरची काच फोडून कोयता दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्या शेजारील आणखी दोन दुकानांचे नुकसान केले. यानंतर तुकाराम कुंभार यांच्या दुकानात त्यांच्यावर कोयता उभारुण राहुल रॉयचा मॅटर आहे, तो क्‍लोज कर नाहीतर मारुण टाकीण अशी धमकी देऊन हाताने मारहाण केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे करत आहे.त

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)