कर आकारणी सर्व्हेवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या

कर आकारणी सर्व्हेवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या
मे.सार आयटी रिसोर्सेस प्रा.लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
पुणे,दि.22-कर आकारणी सर्वेबाबत सादर केलेल्या चार व्हेरिफिकेशन नंबरच्या कागदपत्रांवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या. यानंतर ही कागदत्रे महापालिकेमध्ये सादर करण्यात आली. याप्रकरणी महापालिकेने मे.सार आयटी रिसोर्सेस प्रा.लि. (गोरेगाव, पश्‍चिम मुंबई) कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे शहरातील निवासी, अनिवासी भाग तसेच मोकळ्या प्लॉटचा सर्व्हे करुन ,त्याप्रमाणे कर आकारणी व करसंकलन करण्याकरीता संबंधीत कंपनीची महापालिकेने नेमणूक केली आहे. महापालिकेच्या झोन एक मधील सहायक आयुक्त कार्यालय औंध, घोलेरोड, कोथरुड, वारजे, कर्वेनगर झोन तीन मधील भवानी पेठ, टिळक रोड, कसबा -विश्रामबाग,सहकारनगर, व झोन चारमधील बिबवेवाडी, हडपसर,कोंढवा-वानवडी, धनकवडी या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या निवासी, अनिवासी तसचे मोकळ्या प्लॉटचे सर्व्हे करण्याचे काम कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या सर्व्हेअर, मॉडेटर व समन्वयक यांनी महापालिकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कोथरुड व वारजे माळवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत कर आकारणी सर्व्हेबाबत सादर केलेल्या चार व्हेरिफिकेशन नंबरच्या कागदपत्रांवर पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्या. या सह्या 1/4/2017 ते 6/12/2018 दरम्यान केल्या. यांनरत ही कागदपत्रे महापालिकेत सादर केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एच.एस.गिरी करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)