पुणे : राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद यांच्या जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शाळांमध्ये सॅनिटायझर, सॅनिटायझर स्टॅन्ड आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकांचा संच भेट दिला.
स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरसेविका ऍड. गायत्री खडके यांनी प्रतिमा पूजन केले. सामाजिक कामासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित झालेल्या पीयुष शहा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक आणि स्वातंत्र्य सैनिक वसंत प्रसादे, कार्यालयीन मंत्री संजय देशमुख, कसबा अध्यक्ष प्रमोद कोंढरे, रत्नदीप खडके, रागिणी खडके, किरण जगदाळे, योगिता गोगावले, ओंकार डिंबळे आदी उपस्थित होते.
नवीन मराठी शाळा, रानडे बालक मंदिर, कन्याशाळा, महाराष्ट्र मंडळ, हुजूरपागा, भावे शाळा, शिवाजी मराठा जिजामाता शाळा, रेणुका स्वरुप शाळांतील शिक्षक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.