मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघेही पुन्हा एकदा सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी बाहेर गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी अर्जुनच्या वाढदिवशी मलायका आणि अर्जुन दोघंही सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी अमेरिकेत गेले होते. लॅक्मे फॅशन विक संपल्यानंतर मलायका अर्जुनसोबत सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई बाहेर गेली आहे.
मात्र, यावेळी आपले हॉलिडे डेस्टिनेशन या दोघांनीही गुपित ठेवले आहे. नुकतेच या दोघांना मुंबई विमानतळावर पाहण्यात आले होते, त्यामुळे बॉलिवूडमधली ही चर्चेत असलेली जोडी सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी देशाबाहेर गेली असल्याची चर्चा आहे. मात्र, ते दोघे कुठे गेले आहेत ते केच्वल त्यांनाच माहिती.
अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन आणि मलायका 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुनच्या वाढदिवशी मलायकाने अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. अनेकदा वयाच्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. ही जोडी लग्न करणार अशाही चर्चा आहेत. मात्र, तुर्त लग्नाचा विचार नाही असे या दोघांनी स्पष्ट केले आहे.