Swara Bhasker On Kangana Ranaut – नवनिर्वाचित खासदार कंगना रणावत यांना चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने चापट मारल्याची घटना अलिकडेच घडली होती. त्याचा व्हिडिओही बराच चालला आणि त्यावरून गदारोळही झाला.
संबंधित जवान महिलेचे समर्थन केले जात आहे तर विरोधही केला जातो आहे. आता याच विषयावर अभिनेत्री स्वरा भास्करने वादग्रस्त विधान केले आहे. तिने या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘केवळ चापटच मारली आहे, ती जिवंत तर आहे’ असे म्हटले आहे.
स्वरा म्हणाली की कंगनासोबत जे झाले त्याला कोणीही जबाबदार नागरिक चुकीचेच म्हणेल आणि असे व्हायला नको. कोणाला मारहाण करणे चुकीचे आहे. कंगनाच्या उजव्या विचारसरणीच्या समर्थकांना लोक म्हणत आहेत की त्यांनी याबाबत काही बोलू नये.
कारण हे तेच लोक आहेत जे मॉब लिंचिगचे समर्थन करतात. असे व्हायला नको होते मात्र झाले आणि कंगनाला चापट मारली आहे. मात्र ती जिवंत तर आहे. तिला संरक्षणही देण्यात आले आहे.
आपल्या देशात मारहाण करून लोकांची हत्या करण्यात आली आहे. रेल्वेत सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून गोळ्या झाडल्या गेल्याचे प्रकार घडले आहेत. दंगलीच्या वेळी त्यांच्याकडून लोकांना मारहाण झाल्याचेही पाहायला मिळाले आहे.