Sunil Lahri | Bakri Eid | Ramayana : इस्लाम धर्मात ईदचा सण वर्षातून दोनदा साजरा केला जातो. इस्लामिक कॅलेंडरनुसार, ‘रमजान ईद’ ‘शव्वाल’च्या पहिल्या तारखेला, नवव्या महिन्यानंतरच्या 10व्या महिन्यात म्हणजेच ‘माह-ए-रमजान’ला साजरी केली जाते. याला ‘ईद-उल-फित्र’ आणि ‘मेठी ईद’ असेही म्हणतात.
तर दुसऱ्या ईदला ‘ईद-उल-अजहा’ किंवा ‘बकरीद’ म्हणतात. हा 12 व्या महिन्यात ‘माह-ए-झिल्हजा’ साजरा केला जातो. यावेळी बकरीद आज म्हणजेच 17 जून रोजी बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. मुस्लीम समाजात रमजान आणि बकरी ईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात.
आता बकरी ईदनिमित्त अनेक कलाकार आणि नेते मंडळी मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देताना दिसत आहेत. मात्र, अश्यातच रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते ‘सुनील लहरी’ यांनी एक पोस्ट शेअर केली असून, त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
अभिनेत्यानं या पोस्टद्वारे इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. सुनील लहरी यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दोन व्यक्ती केक कापताना दिसत आहेत.
यावरील मजकुरात असं म्हटलंय, ‘इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करा आणि मुक्या प्राण्यांवर दया करा… हे आवाहनसुद्धा मीडियाने अशा पद्धतीने करावं जसं होळीत पाणी वाचवण्यासाठी, दिवाळीत प्रदूषण रोखण्यासाठी आणि गणेशोत्सवात सांकेतिक विसर्जनासाठी केलं जातं.
देशात सर्वधर्मसमभाव तर आहेच.’ कृपया यंदा हिंसारहित बकरी ईद साजरी करा आणि पर्यावरणाला वाचवा..’ असं अभिनेते सुनील लहरी यांनी म्हंटलं आहे.